मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:17+5:302021-07-16T04:22:17+5:30
चिपळूण : येथील शौय प्रतिष्ठानतर्फे खेर्डीतील कोविड विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ...
चिपळूण : येथील शौय प्रतिष्ठानतर्फे खेर्डीतील कोविड विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, सदस्य विनोद भुरण, शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रेवणे, उपाध्यक्ष रवींद्र गवळी व अन्य उपस्थित होते.
आशा सेविकांना यंत्राचे वाटप
खेड : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोटे घाणेखुंट परिसरातील आशा सेविकांना व गरजू ग्रामस्थांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी वाफेच्या यंत्राचे वाटप करण्यात आले. यासाठी लागणारी ६८ वाफेची यंत्र लोटे औद्यागिक वसाहतीतील कृष्णा ॲन्टीऑक्सिडंट युनिट दोन या कारखान्याकडून सामाजिक बांधिलकी स्वरुपात देण्यात आली.
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन - करजुवे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य पुन्हा वाढल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या महत्त्वाच्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करु, असा इशारा माखजनचे शिवसेना शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी दिला आहे.
मांदिवली ग्रामस्थांची तक्रार
दापोली : कोविड काळात मे महिन्यात रेशन दुकानात आलेल्या मोफत धान्याचे वाटप न केेल्याने संबंधित रेशन दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मांदिवली ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. यावर आता कोणती कारवाई होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दुपरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास लवकरच वेगवान अन् सुखकर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर दरम्यानचे दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील तीन-चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अडथळ्याविना होणार आहे.