साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:48+5:302021-06-16T04:42:48+5:30

चिपळूण : चिपळूण मेडिकल कामगार संघटनेतर्फे अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. शिवभोजन थाळीच्या ...

Distribution of materials | साहित्य वाटप

साहित्य वाटप

Next

चिपळूण : चिपळूण मेडिकल कामगार संघटनेतर्फे अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. शिवभोजन थाळीच्या दोन्ही केंद्रात सॅनिटायझर व मास्कचे वितरित करण्यात आले. यावेळी मेडिकल कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

प्रथमेश भिडेचा सत्कार

खेड : तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी प्रथमेश भिडे याने मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. बिस्कीट पुड्याच्या वेस्टनांचे पर्यावरणावर होणारे परिणाम व पर्यावरणपूरक पर्यायावर प्रक़ल्प सादर केला.

रस्ता रुंदीकरण

खेड : भडगाव-उमरेवाडी ते शेवरवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम संबंधित ठेकेदाराने भर पावसात हाती घेतले आहे. साइडपट्टीवर डांबर टाकून खडीकरण करण्यात येत होते. स्थानिक ग्रामस्थांनी हस्तक्षेप करीत काम थांबवले आहे. निकृष्ट दर्जामुळे काम रोखण्यात आले आहे.

लसीकरणासाठी अर्ज

दापोली : दापोली नगरपंचायतीकडून दि. २१ जूनपासून सुरू होणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी शहरातील नागरिकांकडून दि. १८ जूनपर्यत त्यांची माहिती भरून अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे. कोरे अर्ज नगरपंचायत कार्यालय व प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कसबा गावात चाचण्या

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरानाबाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातील प्रत्येक ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कसबा गावात दिवसभरात ३०० चाचण्या घेण्यात आल्या. माभळे कोष्टेवाडीत १५० लोकांची चाचणी करण्यात आली.

चित्रकला स्पर्धा

खेड : तालुक्यातील आपेडे येथील पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. सात वर्षे, आठ ते अकरा व बारा ते पंधरा वयोगटांतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात येणार असून, प्रथम तीन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे देऊन गाैरविण्यात येणार आहे.

आर्थिक मदत

खेड : तालुक्यातील अठरा गाव मोरे परिवार संचलित कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेकडून वर्षभरात विविध उपक्रमाद्वारे कोरोना संकटात मदतीचा हात दिला. संस्थेतर्फे शासनाला ५० हजार रुपये आरोग्यनिधी धनादेशाद्वारे सुपुर्द करण्यात आला. डिसेंबरपर्यंत बांदरी परिसरात रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात येणार आहे.

Web Title: Distribution of materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.