जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:37+5:302021-06-03T04:22:37+5:30
चिपळूण : तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र व साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी गावातील गरजू व गरीब व्यक्तिंना ...
चिपळूण : तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र व साताराचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी गावातील गरजू व गरीब व्यक्तिंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी सरपंच दिलीप राजेशिर्के, माजी उपसरपंच प्रकाश भोजने, रोहित गमरे, निकिता राजेशिर्के, माजी उपसरपंच प्रकाश भोजने आदी उपस्थित होते.
विक्रेत्यांवर संकट
रत्नागिरी : शाळा सुरू होण्यापूर्वी शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यात येते. गणवेष, वह्या पुस्तके, दप्तरे, चप्पल, बूट, रेनकोट, छत्र्या, टीफीन बाॅक्स, पाण्याची बाॅटल्स अशा विविध साहित्याची खरेदी जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. मात्र, कोरोना संकटामुळे गतवर्षी ऑनलाईन अध्यापन करण्यात आले. यावर्षीही संकट अद्याप कायम असून, लाॅकडाऊनमुळे बाजारपेठही बंद असल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.
पाण्याची उपलब्धता
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद जिल्हा परिषद गटातील मिरवणे आवडवाडी येथे शिवसेनेतर्फे विहिरीवर पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे मुबलक पाण्याची व्यवस्था उपलब्ध झाली असून, भगिनींची गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याची दूरवस्था
रत्नागिरी : जिल्हा वार्षिक योजनेतून आंजणारी पूल ते निवसर मळा असा रस्ता करण्यात आला होता. मात्र, तीन ते चार महिन्यातच रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने रस्ता उखडला गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.