रेनकोटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:21 AM2021-06-28T04:21:53+5:302021-06-28T04:21:53+5:30

नेटवर्कअभावी कामे ठप्प रत्नागिरी : जिल्हा परिषद भवन इमारतीतील काही विभागांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. शिक्षण, ग्रामपंचायत, आरोग्य विभागासह अनेक ...

Distribution of raincoats | रेनकोटचे वाटप

रेनकोटचे वाटप

Next

नेटवर्कअभावी कामे ठप्प

रत्नागिरी : जिल्हा परिषद भवन इमारतीतील काही विभागांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. शिक्षण, ग्रामपंचायत, आरोग्य विभागासह अनेक विभागात नेटवर्क मिळत नसल्याने अनेक कामे ठप्प झाली आहेत. जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने विकासकामांना खीळ बसू लागली आहे.

दगडी बांध हटवला

खेड : घेरारसाळगड-भराडेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर दगडी बांध टाकून मार्ग अडविण्यात आला होता. याबाबत महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबाेधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदारांनी आदेश दिल्याने बांध हटविण्यात आला आहे. ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

पर्यटन विकास मंडळाची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहे.

बाेंड्ये येथे वृक्षवाटप

रत्नागिरी : तालुक्यातील बोंड्ये कुणबीवाडी येथील १०५ कष्टकरी शेतकऱ्यांना कुणबी सेवा संघ, दापोलीच्या नवभारत छात्रालय परिवारातर्फे १०५ साग व काही फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी : आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने पर्यटकांचे आगमन सुरू झाले आहे. हे प्रमाण अल्प असले तरी एका दिवसात पर्यटक परत फिरत आहेत. आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटक समुद्रकिनारे, पर्यटनस्थळांना भेट देत आहेत.

भात लागवडीची कामे वेगात

आरवली : आरवली, माखजन परिसरात भात लागवडीची कामे वेगाने सुरू आहेत. मजुरांची समस्या भेडसावत असल्याने सामूहिक लागवड करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व पावसावर भात पेरणीची कामे झाल्याने रोपे चांगली वाढली असून, लागवडीची कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एस. टी़ सुरू करण्याची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील पोमेंडीबुद्रुक बाणेवाडी हा दुर्गम भाग असून, एस. टी़ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ वेळोवेळी करत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे तीन किलोमीटरपर्यंत ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. अन्यथा रिक्षासाठी पैसे माेजावे लागत आहेत.

लसीकरणाची मागणी

गुहागर : ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार आहे. तत्पूर्वी मच्छिमारांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य नेत्रा ठाकूर यांनी केली आहे. उपाध्यक्ष उदय बने यांना याबाबतचे पत्र त्यांनी दिले आहे.

स्टीमरचे वाटप

दापोली : कुणबी विकास सेवा संघ, असोंड, कुणबी समाज संघ, असोंड गट मुंबई व ग्रामीण यांच्या माध्यमातून ग्रामीण समाजबांधवांना स्टीम मशीनचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील डाॅक्टरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. गटाचे अध्यक्ष चंद्रकांत पड्याळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

Web Title: Distribution of raincoats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.