वाफेच्या मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:48+5:302021-06-04T04:23:48+5:30
राजापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील मंदरुळ गावातील ग्राम कृती दलाच्या माध्यमातून सर्व कुटुंबांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप करण्यात ...
राजापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील मंदरुळ गावातील ग्राम कृती दलाच्या माध्यमातून सर्व कुटुंबांना वाफेच्या मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. सरपंच शेडेकर, उपसरपंच दीपक मासये, राजेश पवार, बापू मासये, मनोहर लोहार आदी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
नागरिकांमधून समाधान
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने ३ ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. यात बँकाही बंद ठेवण्यात येणार होत्या. मात्र आता या कालावधीत पतसंस्था, बँका, सहकारी संस्था, कोरोनाचे नियम पाळून सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहाणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दुकानदारांना चिंता
लांजा : सध्या आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत किराणा आदी वस्तूही खरेदी करता येणार नाहीत. ही विक्री थांबल्याने दुकानातील काही माल खराब होणार आहे. त्यामुळे दुकानदारांचे हजारो रुपयांचे नुकसान होणार आहे. त्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कृती समितीचे आंदोलन
गुहागर : तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य सरकारने केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असल्याने या मच्छिमारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शासनाने फसवणूक केली. या नाराजीतून महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्यावतीने १५ जूनरोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
लसीकरणाबाबत भीती
राजापूर : महिन्यापूर्वी तालुक्यातील लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम लसीकरण करणाऱ्या लाभार्थ्यांसह मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी आता रोडावू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.