जिल्ह्यातील लाॅकडाऊनबाबत जिल्हाधिकारीही सकारात्मक : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:36+5:302021-05-29T04:24:36+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७ टक्केच्या पुढे आहे तसेच मृतांचे प्रमाणही ३.३१ टक्केपर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७ टक्केच्या पुढे आहे तसेच मृतांचे प्रमाणही ३.३१ टक्केपर्यंत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा ‘रेड झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी व अन्य अधिकारीही सकारात्मक आहेत. मात्र, पुढील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव देण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीमध्ये घेण्यात आला होता. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उपकेंद्राचे नामकरण करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. ज्येष्ठ चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर यांचे नाव उपकेंद्राला देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीतील साहित्य क्षेत्राकडून करण्यात येत होती. विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला. रत्नागिरी उपकेंद्राचे नामकरण करताना त्याठिकाणी कीर यांचे साहित्य अभ्यासासाठी ठेवले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या लसीकरण कामाचे सामंत यांनी कौतुक केले.