जिल्हाधिकारी म्हणतात, बालपणीची दिवाळी मनसोक्त आनंद देणारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:51 PM2020-11-14T16:51:35+5:302020-11-14T16:53:24+5:30
diwali, collacator, ratnagirinews बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.
शोभना कांबळे
रत्नागिरी : बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचेजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.
लहानपणीच्या दिवाळी सणाच्या आठवणी जागवताना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिवाळीच्या दिवसातील आनंद पुरेपूर घेत असल्याचे सांगितले. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे लागे. परंतु नवीन कपडे, फराळ आणि फटाके याच्या आकर्षणाने आपोआपच जाग येत असे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर विविध प्रकारची मिठाई खाण्यात खूप मजा येत असे.
महाराष्ष्ट्रात दिवाळीत लाडू, करंज्या या जशा प्रसिद्ध आहेत, तशा आमच्याकडे गुजिया हा पारंपरिक पदार्थ तसेच ह्यनारळाचे लाडूह्ण प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय रसगुल्ला आणि इतर मिठाईही बनवली जाते. हे पदार्थ एकमेकांच्या घरी नेऊन देण्यात फार आनंद वाटे. घरी भरपूर फटाके आणले जात. सगळी मुले एकत्र येत दिवसभर भरपूर फटाके फोडण्याचा आनंद घेत असत.
ओरिसात दिवाळीत कालिपूजा केली जाते. या दिवशी कालीमातेच्या मंदिरात जाऊन पूजाअर्चा होते. महाराष्ट्रातील लक्ष्मीपूजनासाररखी ही पूजा असते. अतिशय भक्तीभावाने ही पूजा आम्ही करत असू. रात्री दिव्यांची सजावट प्रत्येक घरात असे. लहानपणी आम्ही हा सण कधी येतो, याची वाट पाहात असू. आता मोठेपणी हा आनंद दुर्मीळ झाला आहे, अशी खंत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व्यक्त करतात.
आता तो आनंद दुर्मीळ
मोठेपणी कामाचा व्याप वाढतो. त्यामुळे लहानपणीच्या सणांचा आनंद घेता येत नाही. प्रशासनात काम करताना अनेक कर्तव्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचदा आपल्याला दिवाळीसारख्या सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, लहानपणी मनमुराद घेतलेल्या दिवाळीच्या आठवणी अजूनही आनंद देतात, अशा भावना जिल्हाधिकारी मिश्रा व्यक्त करतात.
खबरदारी घ्या...
दिवाळी हा सण दिव्यांचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा हा उत्सव. घरोघरी सुख, शांती आणि समृद्धी यावी, यासाठी या सणाकडे मागणी केली जाते. सध्या कोरोनाचे संकट सर्वत्रच आहे. त्यामुळे जनतेने शासन नियमांचे पालन करून आणि योग्य खबरदारी घेत हा सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.