धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:31 PM2018-11-22T17:31:51+5:302018-11-22T17:33:56+5:30
रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ...
रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी झाडगांव, मुरूगवाडा, १५ माड कोंड ते भाटिमिºया, जाकिमिºया येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
गेली ४० वर्षे या भागातील समुद्र किनाºयांची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भगवतीबंदर येथील ब्रेक वॉटर वॉल अपूर्ण अवस्थेत आहे. ही वॉल १९६७ साली बांधण्यास सुरूवात झाली तेव्हापासून मिºया किनाºयाची धूप होण्यास १९७२, ७३ सालापासून सुरूवात झाली. तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ बांधताना समुद्रात दगडी भिंत बांधण्यात आली आहे.
या कारणांमुळे आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मानवी वस्तीत पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण होतो. तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोणतीच भरपाई नागरिकांना मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघालेला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
टप्पा क्रमांक २ मुळे या गावांमध्ये समुद्राचे अतिक्रमण होत आहे. यासाठी दगडाचा बंधारा बंद करून टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा व्हावा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच हे काम होईपर्यंत टप्पा क्र. २चे दगडी बंधारा बांधण्याचे काम थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
येत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनात आप्पा वांदरकर, राकेश नागवेकर, चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तन्मया शिवलकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, प्रमोद नार्वेकर, रूपेश सनगरे, राजेंद्र बनप, ययाती शिवलकर, मीरा पिलणकर, अॅड. संजय पोकडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.