जिल्ह्यात काेराेना रुग्णांनी पार केला ३० हजारांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:32+5:302021-05-17T04:30:32+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ४८६ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा पार केला ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह ४८६ रुग्ण सापडले आहेत. कोरोना रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने १० रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत ९१५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात रविवारी आरटीपीसीआर चाचणीमध्ये २०५ रुग्ण आणि अँटिजन चाचणीत २१ रुग्ण सापडले आहेत, तर मागील पॉझिटिव्ह २६० रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३०,३३६ झाली आहे. रविवारी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या अहवालानुसार रत्नागिरी तालुक्यात प्रथमच कोरोना रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आली असली तरी इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी तालुक्यात ८५ रुग्ण, खेडमध्ये ३, चिपळुणात ७४, संगमेश्वर २४, मंडणगड ८, लांजात २१, राजापुरात ९ रुग्ण सापडले आहेत, तर खेड आणि गुहागर तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडवली असून, या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १७.७ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या कमी झाली असून, दिवसभरात १० रुग्ण मृत्यू पावले. त्यामध्ये रत्नागिरी, चिपळूण तालुक्यामध्ये प्रत्येकी ३ रुग्ण, संगमेश्वरमध्ये ३, खेड, राजापूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण ३.१ आहे.