जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:02+5:302021-06-16T04:42:02+5:30

दापाेली : दापोली सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेत १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला ...

District level essay, drawing competition results announced | जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

Next

दापाेली : दापोली सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेत १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जुई गद्रे, अर्णव काेतेरे, अन्वय देसाई, मुकुल साेमण, मानसी गानू, तर चित्रकला स्पर्धेत सानवी भिंगार्डे, गौरी जांभळे, ऋषभ काेतवडेकर, रोहित काेकरे, विलास रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला़

निबंध स्पर्धेच्या पहिल्या गटात आज्ञा प्रकाश इंदवटकर - लांजा, ओम मिलिंद शिवलकर - आरे रत्नागिरी. दुसऱ्या गटात स्वरा दुर्वेश साळुंखे - झाडगाव रत्नागिरी, अंशुल विक्रांत पाटील - कुडावळे दापोली, तिसऱ्या गटात हर्षदा नारायण चव्हाण - आंजणारी लांजा, निपुण सचिन लांजेकर - रत्नागिरी, चौथ्या गटात शुभम सीताराम भोवड - देवीहसोळ राजापूर, दीपेश दिनेश लखमदे - दापोली, तर पाचव्या गटात श्रीया शिरीष घाणेकर - जालगाव दापोली आणि विनायक पांडुरंग कुडकर - वेरळ खेड यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला़

चित्रकला स्पर्धेच्या पहिल्या गटात नीरजा मनोज वेदक - चंद्रनगर दापोली, प्रार्थना रामप्रसाद कीर - टेंभ्ये रत्नागिरी, दुसऱ्या गटात मानसी मंदार जुवेकर - कोळबांद्रे दापोली, आभा ऋषिकेश भाटवडेकर - रत्नागिरी, तिसऱ्या गटात श्रीईशा महेश करंदीकर - जालगाव दापोली, पलक राहुल दळी - खेड चिपळूण, चौथ्या गटात पूजा रामचंद्र नारकर - नाचणे रत्नागिरी, विश्वनाथ प्रकाश कळंबटे - हातखंबा रत्नागिरी, पाचव्या खुल्या गटात कमल दिलीप नितोरे - कोळंबे रत्नागिरी, प्रशांत पांडुरंग डिके - कुंभवे दापोली यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.

याव्यतिरिक्त मानसी मंगेश काष्टे - इनाम पांगारी दापोली, आर्या विलास ओक - पालशेत गुहागर, पायल राजेश तांबे - अस्तान खेड, एकनाथ रमेश नाचरे - किल्लावाडी बाणकोट मंडणगड, सारिका दत्तात्रय बिवलकर - कोळथरे दापोली, सलोनी संजय तांबे - कोन्हवळी, देव्हारे मंडणगड या स्पर्धकांना उल्लेखनीय बक्षीस देण्यात येईल. सर्व विजेत्यांना बक्षीस व चषक पोस्टाने घरपोच मिळेल, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे़

Web Title: District level essay, drawing competition results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.