मिलिंद चव्हाण यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:39+5:302021-05-04T04:13:39+5:30

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह ...

District Superintendent of Police complains about Milind Chavan's excellent work | मिलिंद चव्हाण यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गाैरव

मिलिंद चव्हाण यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गाैरव

Next

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर केले आहे. राज्यातील ७९९ कर्मचाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील २४ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद भिकाजी चव्हाण यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले.

गेले वर्षभर कोरोना परिस्थितीमध्येही दिवस-रात्र पोलीस दल राज्यभर कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. कोरोना काळात सेवा बजावून विविध गुन्ह्यांचा तपास तेवढ्याच तत्परतेने केला जात आहे. गेली अनेक वर्ष उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या राज्यातील ७९९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुकाची थाप मारली आहे.

यात रत्नागिरी जिल्ह्यातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, प्रकाश शिंदे, संजय उकार्डे, नाना शिवगण, मिलिंद चव्हाण, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रकाश मोरे, प्रशांत मसुरकर, जितेंद्र कदम, महेश कुबडे, प्रफुल्ल तारये, सचिन भुजबळराव, विनोद भितळे, अजय शिंदे, नितीन कुड, संजय मुठगर, मोहन कांबळे, संदीप महाडिक, नितीन डोमणे, विजय मावळंकर, प्रशांत बोरकर, पोलीस नाईक संदीप मालप, पूनम वाडकर यांना पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तर रोहन गमरे यांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे.

शहरानजिकच्या मिलिंद भिकाजी चव्हाण यांच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल महासंचालकानी जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

या बातमीला ३ रोजीच्या शोभना फोल्डरला मिलिंद चव्हाण नावाने फोटो आहेत.

फोटो मजकूर

आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील मिलिंद भिकाजी चव्हाण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल महाराष्ट्र दिनी महासंचालकानी जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते रत्नागिरीत सन्मानित करण्यात आले.

Web Title: District Superintendent of Police complains about Milind Chavan's excellent work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.