जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:52+5:302021-05-07T04:33:52+5:30
रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी गुरूवारी पटवर्धन प्रशालेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देत नागरिकांच्या ...
रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी गुरूवारी पटवर्धन प्रशालेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देत नागरिकांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी त्यांनी सध्याच्या कोरोना संकटात प्रशासनाला तसेच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शहरातील पटवर्धन प्रशालेत गुरूवारी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारी सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरिकांनी लसचा अपुरा साठा असल्याची समस्या यावेळी सांगून ही समस्या सोडविण्याची त्यांना विनंती केली.
त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर डाॅ. गर्ग यांनी सध्या ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन पुरेसा लससाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच लसीकरण केंद्रावर प्रशासनाच्या मदतीसाठी असलेल्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनाही सहकार्य करावे, असेही आवाहन केले.
यावेळी त्यांनी या केंद्रावर उपस्थित असलेल्या हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी त्यांनी हेल्पिंग हँड्सच्या कार्याचा गौरव केला. तसेच आपल्या कक्षात बोलावून विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा केली. या सर्व मुद्द्यांवर संबंधित सहकाऱ्यांशी चर्चा करून नक्की मार्ग काढू, असे आश्वासन दिले. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचा हुरूप आणखी वाढला आहे.
या बातमीला ६ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये ३ क्रमांकाचा फोटाे आहे.