रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 02:39 PM2020-10-19T14:39:45+5:302020-10-19T14:40:19+5:30

civilhospital, doctor, coronavirus, ratnagiri रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संघमित्रा फुले-गावडे यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती़

District Surgeon Corona of Ratnagiri positive | रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देरत्नागिरीच्या जिल्हा शल्यचिकित्सक कोरोना पॉझिटिव्हतालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके काढले वर

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संघमित्रा फुले-गावडे यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती़

रत्नागिरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संघमित्रा फुले यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे़. गेले सहा महिने डॉ़ फुले दिवस-रात्र कोरोना महामारीमध्ये न थकता काम करीत आहेत़ रुग्णसेवेलाच ते प्राधान्य देत आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या डॉ़ फुले यांनी रविवारी कोरोनाची चाचणी करुन घेतली़ त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत़

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर कोरोना महामारीमध्ये काम करीत असताना अनेकदा त्या जिल्हा दौरा करीत असतात़ या कालावधीत त्यांचा अनेकांशी संपर्क येतो़ त्यामुळे त्यांनी प्रत्येक महिन्याला कोरोनाची तपासणी करुन घेत आहेत. त्याप्रमाणे शनिवारीही डॉ़ कमलापूरकर यांनी कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे़

Web Title: District Surgeon Corona of Ratnagiri positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.