मार्चअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:41+5:302021-09-27T04:34:41+5:30
रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन ...
रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.
सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हागणदारी मुक्त रत्नागिरी जिल्हा करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेची परिभाषा, तांत्रिक पध्दत बदलत चालली आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था तांत्रिक पध्दतीने करणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
स्वच्छतेत रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी यांनी प्रास्ताविक केले. पाणी व स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक अजित माजगांवकर यांनी दहा उपक्रमांची माहिती दिली. श्रध्दा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सरपंच, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.