सह्याद्री विकास समितीचे निसर्गकार्य ईश्वरी : सोमण
By admin | Published: December 17, 2014 09:39 PM2014-12-17T21:39:45+5:302014-12-17T22:55:21+5:30
‘निसर्गवेध’ची सांगता : खगोलतज्ज्ञ सोमणांच्या माहितीपटात रंगले शेकडो विद्यार्थी
चिपळूण : ‘उत्सव निसर्गाचा आणि शोध कलागुणांचा’ या संदेशाने संपन्न होणारा ‘निसर्गवेध २०१४’ हा उपक्रम किंवा गेले १७-१८ वर्षे चाललेले सह्याद्री विकास समितीचे निसर्ग कार्य हे ईश्वरी कार्यच आहे’, असे उद्गार सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ दा. कृ . सोमण यांनी काढले. खेर्डी - चिंचघरी (सती)च्या सभागृहामध्ये ‘निसर्गवेध २०१४’ च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
सती चिंचघरी कॉलेजला हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अपूर्व उत्साहाचा ठरला. सकाळी ७ वाजल्यापासूनच चिपळूण तालुक्यातील विविध महाविद्यालयातले संघ ‘निसर्ग गीत’ स्पर्धेसाठी आपापली वाद्ये घेऊन उत्साहात कॉलेजच्या आवारात दाखल होत होते. सकाळी ९ वाजता प्राचार्य पी. व्ही. पाटील यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. पांडुरंग सोलकर, दीपक संकपाळ आणि मेघना गोखले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. ‘निसर्ग आणि अवकाश’ या विषयावर अत्यंत उद्बोधक असे व्याख्यान आणि चित्रफितीमध्ये तरुणाई रमून गेली.
यानंतर अनिकेत कानिटकर यांनी ाक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन केले. विकास कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचित पेडामकर, अजय कदम, उपक्रम प्रमुख अक्षय सोलकर, स्पर्धाप्रमुख वरद बेंदरकर, हितेश उतेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
विजेते स्पर्धक : निबंध स्पर्धा : प्रथम सलोनी नागनाथ बागडे (न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, खेर्डी - चिंचघरी), द्वितीय शुभांगी सुनील धुमक (इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सावर्डे, तृतीय श्रद्धा अनंत उतेकर (सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय, चिपळूण), उत्तेजनार्थ सुरभी दत्ताराम कदम (एस. पी. एम. ज्युनिअर कॉलेज भोगाळे, चिपळूण), उत्तेजनार्थ रविना विनायक शिंदे (कॉलेज आॅफ फार्मसी, सावर्डे). वक्तृत्व स्पर्धा : प्रथम साक्षी महेश गांधी (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण), द्वितीय प्रणव विनायक माळी (आस. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे परशुराम), तृतीय सायली ब. तिवारी (कॉलेज आॅफ फार्मसी, सावर्डे), उत्तेजनार्थ रोहिणी विजय जाधव (ठाकरसी ज्युनिअर कॉलेज आॅफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स, रामपूर, ता. चिपळूण), उत्तेजनार्थ मासुमा इकबाल वांगडे (एच. डी. ए. हायस्कूल अॅण्ड दलवाई ज्युनिअर कॉलेज, कालुस्ते), उत्तेजनार्थ प्रतीक्षा सुनील धायगुडे (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण).
रांगोळी स्पर्धा : प्रथम नीता गंगाराम भागडे (कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे), द्वितीय ओंकार प्रकाश बुरुंबाडकर (आर. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे - परशुराम), तृतीय सायली संतोष आयरे (आर. सी. काळे ज्युनिअर कॉलेज, पेढे - परशुराम, ता. चिपळूण), उत्तेजनार्थ मंगेश प्रकाश शिगवण (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे).
चित्रकला स्पर्धा : प्रथम अमेय चाळके (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), द्वितीय चारुदत्त धुमाळ (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), तृतीय नीलेश दुर्गावली (सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट, सावर्डे), उत्तेजनार्थ पद्मजा विभाकर वाचासिद्ध (एस. पी. एम. ज्युनिअर कॉलेज, भोगाळे, चिपळूण).
निसर्ग गीत स्पर्धा : प्रथम मयुर मोहिते व सहकारी (गुरुकुल कॉलेज, चिपळूण), द्वितीय गायत्री मोहिते व सहकारी (न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, खेर्डी - चिंचघरी (सती), तृतीय श्रुतिका दळवी व सहकारी (सी. ए. वसंतराव लाड ज्युनिअर कॉलेज, अलोरे) (प्रतिनिधी)