Diwali : रत्नागिरीत साकारली दीपावली शुभेच्छा रॅली, शिस्तबद्ध रॅलीचे नागरिकांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 05:36 PM2018-11-06T17:36:33+5:302018-11-06T17:40:32+5:30
रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभेच्छा रॅली काढण्यात आली होती.
रत्नागिरी : रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभेच्छा रॅली काढण्यात आली होती. यावेळी सर्व महापुरुषांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. समाज बांधवांनी या रॅलीला उदंड प्रतिसाद दिला. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या रॅलीचे नागरिकांनी स्वागत केले.
तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रॅलीमध्ये दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहने समाविष्ट झाली होती. झेंडे लावून भव्य दिव्य अशी ही रॅली काढण्यात आली. श्री देव भैरीचे दर्शन घेऊन खालची आळी, गाडीतळ, गोखले नाका ते माळनाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप ते पुन्हा श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी ही रॅली काढण्यात आली.
समाजात एकोपा निर्माण व्हावा हे या रॅलीचे उद्दीष्ट होते. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करताना या रॅलीच्यावतीने आशादीप संस्था येथे सायंकाळी फराळ वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आले.
या रॅलीला मुन्ना चवंडे, सुदेश मयेकर, रणधीर अमरे, भंडारी ढोलताशा पथक, राजस सुर्वे, सुरेश शेट्ये, नाना बिर्जे यांचे योगदान लाभले. तसेच भंडारी समाजातील तरुणांनी या रॅलीत सहभागी होत मोलाचे योगदान दिले.