सह्याद्रीला डिवचताय ? भविष्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:39+5:302021-08-01T04:29:39+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रा. सतीश ठिगळे यांनी न्यूटन जागवा, दरडी थोपवा या आपल्या पुस्तकातून ...

Do you want to leave Sahyadri? Think of the future | सह्याद्रीला डिवचताय ? भविष्याचा विचार करा

सह्याद्रीला डिवचताय ? भविष्याचा विचार करा

Next

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रा. सतीश ठिगळे यांनी न्यूटन जागवा, दरडी थोपवा या आपल्या पुस्तकातून सह्याद्रीचे विस्तृत चित्र उभे केले आहे. १९८३ सालापासून सातत्याने भूस्खलन, दरडी काेसळणे यासारख्या घटनांचा विशेषत: सह्याद्रीचा सातत्याने अभ्यास करत आहेत. १९८३ साली रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तेव्हापासून ते सह्याद्रीचा अभ्यास करत आहेत. दरडी कोसळण्याचे प्रकारही त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. दरड रस्त्यावर कोसळू दे, डोंगर पायथ्याशी कोसळू दे किंवा शहरात कोसळू दे या साऱ्यामागे मानवनिर्मित कारणेच असतात. निसर्गाला आपण धक्का लावल्यानंतर निसर्गाची ती प्रतिक्रिया असते, हेच प्रा. ठिगळे यांनी आपल्या अभ्यासातून मांडले आहे.

खरे तर सह्याद्रीची ही ओळख अभ्यासक्रमात प्रकर्षाने असायला हवी. पर्यावरण हा विषय आता पाठ्यपुस्तकात असला तरी त्याची ओळख तेवढीच.

डाॅ. माधवराव गाडगीळ यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सह्याद्रीच्या परिसरात वनाधारित विकास होत नाही. त्याऐवजी येथे खनिजाधारित विकासाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच ही खनिजे जमतील तेवढी खणून काढण्याकडे आपला कल असतो. त्यात पैसा भरपूर असल्याने साहजिकच नियम डावलले जातात. दिलेली परवानगी पर्यावरणाला अधीन राहून दिली जाते. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी जास्त खोदकाम केले जाते. तीच बाब खाड्यांमधील वाळू उत्खननाबाबतही दिसते. अवैध उत्खनन आपल्याच अंगाशी येते, याची कल्पना अजूनही आपल्याला आलेली नाही.

सह्याद्री आपल्यासाठी वरदान आहे. मात्र आपण त्यालाच सातत्याने खरवडत असल्याने तो आपल्यासाठी त्रासदायक ठरत आहे. यात दोष सह्याद्रीचा नाही, निसर्गाचा नाही. हा दोष आपला आहे. वेळीच जागे होण्याची गरज आहे.

Web Title: Do you want to leave Sahyadri? Think of the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.