श्वान-विंचू दंश वाढले

By admin | Published: February 13, 2015 09:08 PM2015-02-13T21:08:03+5:302015-02-13T23:00:04+5:30

चिपळूण तालुका : आरोग्य केंद्रांची जबाबदारी वाढली

Dog-scorpion bite increased | श्वान-विंचू दंश वाढले

श्वान-विंचू दंश वाढले

Next

अडरे : चिपळूण तालुक्यात जानेवारी महिन्यात श्वान व विंचूदंशाचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने एकही रुग्ण दगावल्याचे वृत्त नाही. सर्वांत जास्त रूग्ण शिरगाव प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत आढळले.
चिपळूण तालुक्यात नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या तालुक्यात थंडीचे प्रमाण अधिक असते. पावसाळ्यात भरपूर पाऊस, तर उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन असते. यामुळे, येथे विंचंूचे प्रमाण जास्त असते. जानेवारी महिन्यात रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्पदंशाचा एक, विंचूदंश दोन तर श्वानदंशाचे पाच रूग्ण आढळले. कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात विंचू दंशाचे दोन, तर श्वान दंशाचे सहा रूग्ण आढळले. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विंचू दंशाचा एक, तर श्वान दंशाचे सहा रूग्ण आढळले.
दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत विंचू दंशाचे पाच, तर श्वान दंशाचे पाच रूग्ण आढळले. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशाचे तीन, विंचू दंशाचे पाच तर श्वान दंशाचे २६ रूग्ण आढळले. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत विंचू दंशाचे ११ आणि श्वान दंशाचे पाच रूग्ण आढळले. सावर्डे आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्पदंश एक, विंचूदंश तीन तर श्वान दंशाचे दहा रूग्ण आढळले. फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्पदंश एक, विंचूदंश तीन, तर वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्पदंश एक, विंचूदंश एक व श्वान दंशाचे नऊ रुग्ण आढळले.
विंचू व श्वानदंशांचे रूग्ण कमालीचे वाढले आहे. ग्रामीण भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. ते वाहनचालकांच्या अंगावर येतात, अनेकवेळा पाठलाग करतात, त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. आरोग्यविभागाने यात लक्ष घालावे. (वार्ताहर)


प्रमाण चिंताजनक
श्वानांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने, त्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. रात्रीच्यावेळी हे श्वान गाड्यांचाही पाठलाग करतात. दुचाकी चालकांची यामुळे तारांबळ उडते. अनेकवेळा हे दंश करतात आणि त्याची नाहक शिक्षा भोगावी लागते. तरी भटक्या श्वानांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

Web Title: Dog-scorpion bite increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.