शाश्वत शेरे कुटुंबाकडून सोनवडे विद्यालयाला देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:32 AM2021-09-19T04:32:25+5:302021-09-19T04:32:25+5:30

देवरुख : सोनवी, गडगडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, सोनवडेला रत्नागिरी येथील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे ...

Donation to Sonawade Vidyalaya from Shaswat Shere family | शाश्वत शेरे कुटुंबाकडून सोनवडे विद्यालयाला देणगी

शाश्वत शेरे कुटुंबाकडून सोनवडे विद्यालयाला देणगी

googlenewsNext

देवरुख : सोनवी, गडगडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, सोनवडेला रत्नागिरी येथील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे आणि त्यांच्या अमेरिकास्थित भगिनी ऋजुता पाथरे यांची कन्या मीनाक्षी पाथरे यांनी कै. विश्रांतीदेवी विद्याकुमार शेरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने देणगी दिली.

कै. विश्रांतीदेवी शेरे या सोनवडे गावच्या माहेरवाशीण, पूर्वाश्रमीच्या द्वारका आत्माराम कापडी या होत. शेरे आणि पाथरे कुटुंबाने सोनवडे प्रशालेला डिजिटल लायब्ररी आणि क्लासरूमसाठी एक लाख रुपयांची देणगी, प्रोजेक्टर व टेबल तसेच प्रशालेच्या व्यायाम शाळेसाठी सायकल भेट दिली. या कार्यक्रमाला व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, उपाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, संस्था पदाधिकारी सीमा खेडेकर, अनिल नांदळजकर, संस्था संचालक उपस्थित होते.

संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे यांनी डॉ. शाश्वत व शमीन शेरे यांचा संस्थेतर्फे सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजय सरदेसाई यांनी केले. त्यानंतर संस्था संचालक व वास्तुरचनाकार हेमंत कापडी यांनी डॉ. शाश्वत व शमीन शेरे या दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला.

यावेळी डॉ. शेरे व शमीन शेरे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना सुदृढ आरोग्यासाठी व्यायामासह खानपानाचे असणारे महत्त्व, अभ्यासाची एकाग्रता वाढण्यासाठी करायचे उपाय यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. बनकर यांनी, तर आभार एस. एस. मोहिते यांनी मानले.

180921\20210918_125423.jpg~180921\20210918_125349.jpg

फोटो . डिजिटल लायब्ररी उपक्रमाची कोनशिला प्रदर्शित करताना डॉ. शेरे~आणि उपस्थित मान्यवर

डॉ. शेरे यांना सन्मानित करताना संस्थाध्यक्ष सनगरे आणि उपस्थित मान्यवर

Web Title: Donation to Sonawade Vidyalaya from Shaswat Shere family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.