कडवई आरोग्य केंद्राला ग्रामस्थांकडून देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:56+5:302021-06-27T04:20:56+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांकडून पाण्याचा कूलर व इन्व्हर्टर देणगी स्वरूपात देण्यात आला आहे. ...
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थांकडून पाण्याचा कूलर व इन्व्हर्टर देणगी स्वरूपात देण्यात आला आहे.
कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला यापूर्वीही मुस्लीम समाजातील दानशूर व्यक्तींनी अनेक वस्तू देणगी स्वरूपात दिल्या आहेत. हा मदतीचा ओघ सुरूच आहे. यापूर्वी ऑक्सिजन सिलिंडर तसेच बेड देण्यात आले असून, सध्या विजेची गरज लक्षात घेता इन्व्हर्टर तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कूलरची आवश्यकता होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते इस्माईल (नाना) जुवळे व त्यांचे बंधू नजीर जुवळे यांनी इन्व्हर्टर देणगी स्वरूपात दिला.
पांगारकर बंधू यांनी रुग्णांची थंड व गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी वॉटर कूलर देणगी स्वरूपात दिला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी संतोष यादव यांनी देणगीदारांचे आभार मानले.
यावेळी इस्माईल जुवळे, नजीर जुवळे, अनवर पांगारकर, मुस्ताक सावंत, मौअजम कडवईकर, फैयाज माखजनकर, नविद पांगारकर, तन्वीर पांगारकर, नासीर पिलपिले उपस्थित होते.