वीज बिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:30+5:302021-03-27T04:33:30+5:30

वीज बिलाची वसुली सक्तीने करू नये याबाबतचे निवेदन भाजपतर्फे महावितरणचे काेकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्याकडे देण्यात आले. ...

Don't bother the common man while collecting electricity bills: Nilesh Rane | वीज बिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : नीलेश राणे

वीज बिलाची वसुली करताना सामान्यांना त्रास देऊ नका : नीलेश राणे

Next

वीज बिलाची वसुली सक्तीने करू नये याबाबतचे निवेदन भाजपतर्फे महावितरणचे काेकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्याकडे देण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : वीज बिल थकबाकीची वसुली करताना सामान्य माणसांना त्रास होता काम नये या भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या मागणीला महावितरणकडून सकारात्मक प्रतिसाद देत येत्या एप्रिलपासून ‘एक गाव एक दिवस’ अभियान राबवीत प्रत्यक्ष ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या अडचणी दूर करूनच ही वसुली होईल, असे आश्वासन कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी दिले आहे.

लॉकडाऊनमध्ये थकलेल्या वीज बिलाची महावितरणकडून अन्यायकारक वसुली होत असल्याच्या तक्रारी माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात येत होत्या. याची दखल घेऊन नीलेश राणे यांनी सायनेकर यांच्याशी संपर्क साधला होता, तर शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र सायनेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नीलेश राणे यांचे निवेदन त्यांना दिले होते. यामध्ये वसुली करताना सामान्य नागरिकांना त्रास दिल्यास संघर्षाला तोंड द्यावे लागेल असा इशारा नीलेश राणे यांनी दिला होता.

कोकण परिमंडळमध्ये येणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बहुसंख्य लोकांनी अन्यायकारक वीज बिल वसुलीबाबत तक्रारी केल्या आहेत. कोविड -१९ च्या कालावधीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जनतेचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. कोकणातील जनता वीज बिलाच्या थकीत रकमा टप्प्याटप्प्याने भरणा करीत आहेत. मात्र, मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अन्यायकारक पद्धतीने वसुली केली जात आहे. कर्मचारी ती पूर्ण भरण्यासाठी तगादा लावत आहेत. तसेच भरणा केला नाही तर वीज कनेक्शनदेखील कापले जात आहे. टप्प्याटप्प्याने पैसे भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन न तोडण्यासाठी तत्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी या निवेदनामध्ये केली होती.

यावेळी देवेंद्र सायनेकर यांनी नीलेश राणे यांच्याशी दूरध्वनीवरून आपली भूमिका स्पष्ट केली, तर भाजप उपतालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, उपतालुकाध्यक्ष पिंट्या निवळकर, सहप्रवक्ते नित्यानंद दळवी, मेहताब साखरकर, तालुका चिटणीस ययाती शिवलकर, राहुल भाटकर, अभिजित साळुंखे, रमाकांत आयरे, शिवाजी कारेकर यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Don't bother the common man while collecting electricity bills: Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.