या चुका करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:05+5:302021-07-10T04:22:05+5:30
तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत वायफळ गप्पा मारणे बंद करा .लोकांना बऱ्याचदा बिनकामाच्या गप्पा मारण्याची सवय असते. आपण त्याला ...
तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत वायफळ गप्पा मारणे बंद करा .लोकांना बऱ्याचदा बिनकामाच्या गप्पा मारण्याची सवय असते. आपण त्याला गॉसिप असं गोंडस नाव देखील देतो. मात्र इतरांबाबत केल्या जाणाऱ्या या गप्पा आपल्या काहीच कामाच्या नाहीत, हेच अनेकांना समजत नाही. शिवाय या गप्पा मारण्याच्या नादात आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचा वेळ सहज वाया घालवतो. ज्यामुळे यशासाठी लागणारे प्रयत्न कमी पडतात. यशस्वी माणसं मात्र जीवनात अशा गप्पा मारण्यात मुळीच वेळ वाया घालवत नाहीत. हे त्यांच्या यशमागचं एक महत्त्वाचं कारण असतं. चौथे म्हणजे स्वतःला दोष देत राहणे बंद करा .काहीही घडलं तरी त्यासाठी स्वतः ला जबाबदार धरण्याची अनेकांना सवय असते. मात्र असं केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नकळत कमी होत जातो. यासाठी केलेल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा त्यातून योग्य धडा घेणं फार गरजेचं आहे. जीवनात यशस्वी झालेल्या माणसांनी आयुष्यात कधीच काही चुका केलेल्या नसतात, असं मुळीच नाही. कारण चुकांमधूनच माणसं नवं काहीतरी शिकत असतात. त्यामुळे अशा चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं, याचा विचार करणं फार गरजेचं आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत बसू नका. जीवनात कधी कोणत्या परिस्थितीला माणसाला सामोरं जावं लागेल, हे सांगता येत नाही. मात्र जर कधी वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं, तर नशिबात असेल तसं घडेल अथवा चांगली परिस्थिती येण्याची वाट पाहत राहणं फारच चुकीचं ठरेल. यशस्वी माणसं कधीच अशी परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत राहत नाहीत. उलट योग्य निर्णय घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे विनाकारण कोणत्याही गोष्टींची अती चिंता करू नका. काहीवेळा एखाद्या गोष्टीचा अती विचार करत बसल्यामुळे नकळत चिंता, काळजीने तुमचे मन गढूळ होत जातं. असं अती चिंता केल्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणारी भीती तुमचा वर्तमान काळ खराब करू शकते. शिवाय याचा ताण आल्यामुळे माणसे नैराश्येच्या अधीन जाऊ शकतात. ज्याचा परिणाम नक्कीच घातक ठरू शकतो. असं असेल तर विनाकारण चिंता, काळजी करत बसण्यापेक्षा सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न करून तुम्ही तुमच्या जीवनात यश खेचून आणू शकता.
डॉ . गजानन पाटील