घाबरू नका, आराेग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:05+5:302021-06-04T04:24:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क साखरपा : ‘काही मदत लागली तर हक्काने सांगा, तुम्ही घाबरू नका, मी आहे फक्त तुम्ही आराेग्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : ‘काही मदत लागली तर हक्काने सांगा, तुम्ही घाबरू नका, मी आहे फक्त तुम्ही आराेग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा’, असा आपुलकीचा संदेश काेंडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बापू शेट्ये यांनी साखरपा येथील संस्थात्मक ठेवलेल्या रुग्णांना दिला़
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील साखरपा येथील संस्थात्मक सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ या रुग्णांची बापू शेट्ये यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली़ त्यांना धीर दिला़ यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनुरकर, पोलीस पाटील मारुती शिंदे, उद्योगपती विठोबा गोरुले, बंड्या पोटफोडे उपस्थित होते़
साखरपा येथील संस्थात्मक सेंटरमधील रुग्णांना कोंडगावचे व्यापारी पारस गांधी, अक्षय गांधी हे दाेन वेळा मोफत जेवण पुरवत आहेत़ तर ओंकार कोलते, प्रसाद कोलते यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे़
---------------------
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील रुग्णांची बापू शेट्ये यांनी भेट घेऊन विचारपूस केली़