विनाकारण प्रवास करू नका : मानसी जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:13+5:302021-04-20T04:32:13+5:30
खेड : महामार्गावर कशेडी बंगला येथे ॲन्टिजेन टेस्ट करूनच गाड्या सोडल्या जात आहेत. सर्वांचीच तपासणी केली जाणार असून, पॉझिटिव्ह ...
खेड : महामार्गावर कशेडी बंगला येथे ॲन्टिजेन टेस्ट करूनच गाड्या सोडल्या जात आहेत. सर्वांचीच तपासणी केली जाणार असून, पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड केअर सेंटर लवेल येथे ॲडमीट करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. महत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन खेड पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे यांनी केले आहे.
सभापतींनी कशेडी येथे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची पाहणी करून कर्मचारी, सर्व सोयीसुविधा आहेत की नाही पाहणी केली. तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर हे काम चोख बजावत असून शिक्षण विभागातील शिक्षक मंडळी व पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे विनाकारण कुणीही प्रवास करू नये. घरीच थांबा स्वत: सुरक्षित राहा व कुटुंबालाही सुरक्षित ठेवा. काेरोनाचा फैलाव मोठ्या संख्येने होत आहे. ब्रेक द चेन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करावे. महत्त्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका. कशेडी येथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पोलीस बांधवांना सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शशिकांत चव्हाण, अजिंक्य मोरे, राकेश सागवेकर, सरपंच संजय दरेकर, सुरेश दरेकर, महेश जगदाळे, करण चव्हाण व सहकारी उपस्थित होते.