डबल मास्क; कोरोना संरक्षक कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:43+5:302021-05-05T04:52:43+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मास्क सतत चेहऱ्यावर असेल तर कोरोनाच्या संसर्गापासून ९५ टक्के संरक्षण होते, असा निर्वाळा ...

Double mask; Corona protective shield | डबल मास्क; कोरोना संरक्षक कवच

डबल मास्क; कोरोना संरक्षक कवच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मास्क सतत चेहऱ्यावर असेल तर कोरोनाच्या संसर्गापासून ९५ टक्के संरक्षण होते, असा निर्वाळा आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाचा विषाणू रोखण्यासाठी चांगल्या प्रतिचे, काॅटनचे मास्क वापरावेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांंनी अधिकाधीक मास्क वापरणे गरजेचे आहे; मात्र हे मास्क वापरतानाही ते योग्य पद्धतीने वापरले न गेल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो, असेही तज्ज्ञ सांगतात.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा प्रतिकार करताना कोरोनापासून वाचण्यासाठी डबल लेअरच्या मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव हवेतून होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्ती खोकली किंवा शिंकली तरी त्याचे काही शिंतोडे हवेत उडतात, त्यातून विषाणूही फेकला जातो. तो हवेत काही काळ जिवंत राहू शकतो. दुसऱ्या लाटेत अशाच विषाणूंपासून प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. हवेत काही काळ जिवंत असलेले हे विषाणू काही वस्तू किंवा पृष्ठभागावर राहिल्यास त्याला स्पर्श केल्यास त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच एकावर एक असे दोन मास्क बांधल्यास हवेतील कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग आपल्या श्वासाद्वारे शरीरात होणार नाही. त्यामुळे आताच्या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी डबल मास्क वापरावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय

देशात सध्या सुरू असलेली कोरोनाची लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. काेरोनाच्या या लाटेत अनेक नवीन लक्षणे तसेच कोरोनाचे नवीन प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर त्याचा संसर्ग रोखणे हे मोठे आवाहन उभे आहे. दुसऱ्या लाटेतील या काेराेनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव हा हवेतून होत आहे. त्यामुळे फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. त्यामुळे फैलाव रोखण्यासाठी नाक आणि तोंडावाटे तो शरीरात जाणारा नाही, याची दक्षता घेण्यासाठी मास्क हा सर्वेात्तम उपाय आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे असल्याचे डाॅ. महेंद्र गावडे यांनी सांगितले.

डबल मास्क कसा बांधावा

दोन कापडी मास्क एकत्र घेऊन डबल मास्क तयार करता येतो. त्यासाठी एकाच मापाचे दोन मास्क घेऊन ते एकत्र बांधता येतात.

एक सर्जिकल मास्क आणि एक कापडी मास्क लावून तो झाकून टाकावा.

मास्क घेताना तो योग्य आकाराचा आहे का, हे पाहायला हवे. सैल असेल तर त्याचा उपयोग होणार नाही.

मास्क व्यवस्थित असेल तरच विषाणू संसर्ग होणार नाही.

मास्क वापरताना दर्जेदार कापडी असावा. तो चेहऱ्यावर योग्यरीत्या बसणारा असावा.

दुहेरी मास्क वापरताना आधी सर्जिकल मास्क आणि त्यावर कापडी मास्क असा लावावा.

एकदा वापरलेला मास्क परत वापरू नये. तो कापडी असेल तर निर्जंतुक केल्यानंतरच परत वापरावा.

मास्कला वारंवार हात लावू नये. हात लावल्यास ताबडतोब धुवावेत.

गर्दीत वावरताना मास्कचा वापर करावा.

चुकीच्या पद्धतीने मास्क वापरला तर त्यापासून कोरोनाचा संसर्ग अघिक वाढण्याचा धोका असतो.

एकच मास्क वारंवार वापरू नये. वापरल्यानंतर तो तसाच न टाकता कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकावा.

एकदा मास्क लावल्यानंतर तो सातत्याने काढून पुन्हा लावू नये. त्यामुळे आपल्या हातांना त्यावर असलेल्या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

मास्क कापडी असावा तसेच तो ओला असलेला बांधल्यास संसर्गाचा धोका वाढतो.

Web Title: Double mask; Corona protective shield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.