डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचतर्फे सन्मानपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:17+5:302021-05-03T04:25:17+5:30
खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या साहित्यिक संस्थेतर्फे गेले एक वर्षभर आपला जीव धोक्यात घालून कोरोना ...
खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या साहित्यिक संस्थेतर्फे गेले एक वर्षभर आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीत योद्ध्याप्रमाणे काम करणाऱ्या ५५ जणांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, शिक्षक, पत्रकार आणि सफाई कामगार, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, विविध सामाजिक संघटना, आपल्याला अन्नधान्याची सुविधा निर्माण करून देणारे व्यावसायिक आणि सरकार हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी देवदूत आहेत. त्याच्या या महान कर्तबगारीचा गौरव करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या संस्थेने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील ५५ जणांना सन्मानपत्र देऊन त्याचा विशेष गौरव केला. हे सन्मानपत्र त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्रचे संस्थापक मनोज जाधव, सुरेश कुराडे, सुनील सुरेखा, जितेंद्र मोहिते यांनी सहभाग घेतला.