नाट्य स्पर्धेच्या तिकिटांमधून दीड लाखांचा सूर
By admin | Published: February 6, 2015 11:02 PM2015-02-06T23:02:57+5:302015-02-07T00:15:31+5:30
राज्य संगीत नाट्य स्पर्धा : रत्नागिरीकर नाट्यरसिकांनी दिला भरभरून प्रतिसाद
रत्नागिरी : महाराष्ट्र् राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी केंद्रावरती पार पडली. १६ ते ४ फेब्रुवारीअखेर सादर करण्यात आलेल्या संगीत नाटकांची १ लाख ४८ हजार ५८५ रुपयांची तिकिट विक्री झाली आहे.संगीत नाट्य स्पर्धेसाठी प्रेक्षकांचा प्रतीसाद उत्स्फूर्त होता. तिकिटे संपल्यामुळे हाऊसफुल्लचे बोर्डही लावण्यात आले होते. अनेक नाट्यरसिकांना तिकिटे न मिळाल्यामुळे हिरमोडही झाला. संगीत मत्स्यगंधा हा प्रयोग दि. १६ रोजी आश्रय सेवा संस्थेने सादर केला. त्यादिवशी ९ हजार ८२० रूपयांची तिकिट विक्री झाली. १७ रोजी सौभद्र नाट्य प्रयोगाची ९ हजार ८६० रुपयांची तिकिटे संपली. १९ रोजी संत सोहिरोबानाथ नाटकाची ५ हजार १७० रुपये तर २० रोजी संगीत एकच प्याला नाटकाची ९ हजार ४७० रुपयांची तिकिटे संपली.दि. २१ रोजी खल्वायनने सादर केलेल्या प्रिती संगमची १० हजार ९८५ रुपयांची तिकिटे संपली. संगीत धन्य ते गायनी कला नाटकाची ५ हजार ९९५ रुपयांची तर संगीत तुक्याची आवली ४ हजार ९६५ रुपयांची तिकिट विक्री झाली. संगीत पंढरपूर ४ हजार ८९५, संगीत शारदा ८ हजार ९८०, संगीत स्वयंवर ११ हजार ३२५ रुपयांची तिकिट विक्री झाली. गीता गाती ज्ञानेश्वर नाटकाची ३,९३५ रुपयांची तिकिटे संपली. चंद्र लपला मेघावरी नाटकाची ५ हजार ३५ रुपये तर संगीत मत्स्यगंधाची ११ हजार ७८० रुपयांची तिकिटविक्री झाली. संगीत संशयकल्लोळची १० हजार ७२० तर लावणी भुलली अभंगाला १० हजार ४०, संगीत ययाती देवयानी नाटकाची १० हजार ३४५ रुपयांची तिकिटे संपली. लावणी भुलली अभंगाला या नाट्यप्रयोगाची ७ हजार ८१५ तर संगीत स्वर्गहरण नाटकाची ७ हजार ४२० रुपयांची तिकिट विक्री झाली. सर्वात अधिक तिकिट विक्री संगीत मत्स्यगंधा नाटकाची झाली. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र शासन सांस्कृ तिक कार्य संचालनालयास ७४ हजार ७९४ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गतवर्षी संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायनने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संगीत नाट्य स्पर्धेचे यजमानपद परत रत्नागिरीकरांना प्राप्त झाले होते. गतवर्षीपासून दर्जेदार संगीत नाटकांचा आस्वाद रत्नागिरीकरांना मिळू लागला आहे. (प्रतिनिधी)