CoronaVirus : जिल्ह्यातील शिवसेना आमदारांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:28 AM2020-05-28T10:28:37+5:302020-05-28T10:30:40+5:30
उत्तर रत्नागिरीमधील शिवसेनेच्या एका आमदाराचा चालक कांदिवलीवरून जामगे येथे आलेल्या वाहन चालक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहिती वरून कळंबणी येथील रुग्णालय मध्ये संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते.
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीमधील शिवसेनेच्या एका आमदाराचा चालक कांदिवलीवरून जामगे येथे आलेल्या वाहन चालक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहिती वरून कळंबणी येथील रुग्णालय मध्ये संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते.
जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखीन १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९५ इतकी झाली आहे.
एकवेळ ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरीतील ६, कळंबणीतील ३, आणि राजापूर तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या ६ रुग्णांमध्ये दोन स्त्रिया आणि चार पुरुष आहेत. ४५ वर्षांची एक स्त्री मजगाव रोडची रहिवासी असून, ठाण्यातून आली आहे. ४४ वर्षांची स्त्री साखरप्यातील मुरलीधर आळीतील असून, तीही मुंबईतून आली आहे. ६२ वर्षांचा एक पुरुष भंडारपुळे (रत्नागिरी) येथील, ५७ वर्षांचा एक पुरुष उक्षी वरची वाडी (संगमेश्वर) येथील २७ वर्षांचा एक पुरुष आगवे (लांजा) येथील, तर २५ वर्षांचा एक पुरुष साखरपा-देवळे (संगमेश्वर) येथील आहे. हे सर्व जण मुंबईतून आले आहेत.
त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १९५ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११४ आहे. सर्व जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
बुधवारी रात्री आलेल्या तपासणी अहवालात कांदिवलीवरून जामगे येथे प्रवास केलेल्या चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या चालकाचा तसा प्रत्यक्ष संबंध त्या लोकप्रतिनिधीशी आलेला नाही. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीना कोणताही धोका नाही.
हे लोकप्रतिनिधी विद्यमान सरकारमधील लोकप्रतिनिधी आहेत. पण लॉकडाऊन झाल्यापासून तो चालक आमदारांच्या गाडीवर नव्हता, असे सांगण्यात येत आहे. कळंबणी येथील रुग्णालयात तो चालक दाखल होता.