चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली, २७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 02:13 PM2020-01-25T14:13:41+5:302020-01-25T14:16:23+5:30

मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.

Driver's release gives ST One passenger injured, two seriously injured | चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली, २७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली, २७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

Next
ठळक मुद्देचालकाचा ताबा सुटल्याने एस.टी. पुलावरून कोसळली२७ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

दापोली (रत्नागिरी) : मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.

मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही एस.टी. बस क्रं. एमएच १४ बीटी 0१४३ ही दापोली (रत्नागिरी) आगाराची बस पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या बसमध्ये ४४ प्रवासी होते. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन प्रवाशी गंभीर असून त्यांच्यावर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जखमी प्रवाशांना तत्काळ खासगी वाहनातून व पोलीस गाडीतुन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगांव येथे पाठविण्यात आले. इतर प्रवाश्यांना माणगावमधून एस.टी. बसने पुढील प्रवासासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातानंतर माणगाव पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरु केली आहे.

एसटी चालक देवेंद्र पांडुरंग येलवे (दापोली आगार) याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाहक कमलाकर शांताराम मिरझुलकर (दापोली आगार) सोबत होते. याप्रकरणी माणगांव पोलिस ठाण्यातील अधिकारी अधिक तपास करीत आहेत. अपघाताची माहिती माणगाव आगार प्रमुख चेतन देवधर यांनी पोलिसांना दिली आहे.

Web Title: Driver's release gives ST One passenger injured, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.