लोकवर्गणीतून सुकेणे-वडाळी रस्ता
By admin | Published: September 16, 2016 10:31 PM2016-09-16T22:31:45+5:302016-09-16T22:32:13+5:30
सामाजिक बांधीलकी : दहा वर्षांपासून रस्ता होता प्रलंबित
रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक शौचालये बांधणाऱ्या १५ हजार ९९१ कुटुंबियांना १८ कोटी ९८ लाख ४२ हजार २०० रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मार्च, २०१७ अखेर १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडून वाटचाल सुरू आहे. तसेच किनारपट्टीवरील गावांमध्ये शौचालय बांधण्यास सीआरझेडचा मोठा अडथळा होता. तोही आता दूर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या गावातील १७४२ कुटुुंबियांना होणार आहे. जिल्ह्यात अजून ३२ हजार कुटुंबियांनी शौचालये बांधायची आहेत, तर ६८ हजार ३२८ कुटुंबियांनी शौचालये बांधली आहेत. ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करणे आणि सर्वांना स्वच्छतेच्या सोयीसुविधा पुरविणे हा योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये वैयक्तिक, सामुदायिक किंवा सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामांसाठी स्वच्छ भारत मिशनकडून अनुदान देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाला २१ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतके वैयक्तिक शौचालयाचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. वैयक्तिक शौचालये पूर्ण झालेल्या १५ हजार ९९१ प्रस्तावांना १८ कोटी ९८ लाख ४ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीस्तरावरून देण्यात आली.
संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जनजागृती मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. या जनजागृती मोहिमेमधून स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना पटवून देऊन अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. (शहर वार्ताहर)
देशात जिल्हा आठव्या क्रमांकावर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर पहिल्या दहामध्ये रत्नागिरी जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा हा क्रमांक वरच्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न आहेत.
जिल्ह्यातील वैयक्तिक शौचालयांचे तालुकानिहाय प्रस्ताव खालीलप्रमाणे आहेत.
तालुकावैयक्तिक
शौचालये
मंडणगड४११
दापोली१७६६
खेड१९३५
चिपळूण४४०८
गुहागर११९
संगमेश्वर२०४७
रत्नागिरी२६७०
लांजा ८९७
राजापूर१८२८
एकूण१५९९१