गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:24 PM2022-07-15T16:24:28+5:302022-07-15T16:25:08+5:30

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

Dubai-based agency shows reluctance to rescue Basra Star stranded off Mirya beach in Ratnagiri | गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

googlenewsNext

रत्नागिरी : येथील मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यासाठी दुबईतील एजन्सीने अनुत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे.

हे इंधनवाहक जहाज दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा दुबईला निघाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटून मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर ३ जून २०१९ ला आले हाेते. तांत्रिक बिघाडामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्र किनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलीस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड दूतावासाशी अरब आमिरातीच्या पत्रव्यवहार सुरू आहे.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साहाय्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने काेट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खर्चामुळे एजन्सीने जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.

अनेक अडचणी आल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे जहाज अद्यापही मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरच पावसासह लाटांचा मारा झेलत उभे आहे. त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा काढण्यात आले नाही.

केंद्राकडून तांत्रिक मंजुरी नाही

हे जहाज भंगारात काढण्यासाठी गाेव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही लाेकांना एकत्र येत याचा ठेका घेण्याचे ठरविले. स्थानिक एजन्सीकडून हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हाेते. मात्र, केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामही रखडले.

Web Title: Dubai-based agency shows reluctance to rescue Basra Star stranded off Mirya beach in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.