आंजर्ले खाडीत बुडून दोघांचा मृत्य
By admin | Published: January 18, 2016 10:50 PM2016-01-18T22:50:45+5:302016-01-18T23:33:19+5:30
दोघेही अडकळ पाटीलवाडीतील : दोन दिवसापासून होते बेपत्ताू
दापोली : आंजर्ले खाडीत रविवारी बेपत्ता झालेले शंकर धोंडू तळवटकर (वय ६०) व राजेश सुरेश पाडावे (वय ३१ दोघेही रा. अडकळ पाटील वाडी ता. दापोली) या दोघांचे मृतदेह सोमवारी दुपारी सापडले. खाडीत बुडून या दोघांचा मृत्यू झाला आहे.
आंजर्ले खाडी पलीकडील पोंगळे गावात आयुर्वेदिक औषधे आणण्यासाठी हे दोघे रविवारी सकाळी जात होते. खाडीत अचानक मोठी ओहोटी आल्याने व पाण्याचा कंरट लागून दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते.
रविवारी दिवसभर त्यांचा गावातील लोकांनी शोध घेऊनही ते सापडले नव्हते. मात्र सोमवारी सकाळी या दोघांचे मृतदेह खाडीत सापडले. याबाबतची माहिती मनोज शिर्के यांनी दापोली पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मृत दोघेही शेतमजूर होते. शेतमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र आज त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावरती दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. जी. कांबळे व हवालदार राजू मोहीते करीत आहेत. (प्रतिनिधी)