देवरूख आगारातील लांबपल्ल्याच्या ८ बसफेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 05:31 PM2017-07-22T17:31:16+5:302017-07-22T17:31:16+5:30
‘रिबुक’ न होण्याचे चालक - वाहकांचे आंदोलन सुरुच
Next
देवरूख : देवरूख आगारातील चालक - वाहकांचे सलग दुसऱ्या दिवशीही ‘रिबुक’ न होण्याचे आंदोलन सुरूच असल्याने लांबपल्ल्याच्या ८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
हे आंदोलन सुरू असल्याने ८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या बसफेऱ्यांमध्ये सकाळी ६ वा. सुटणारी संगमेश्वर - बेळगाव, ८ वा.ची देवरूख - चिंचवड, ९.१५ वा.ची संगमेश्वर - अक्कलकोट, दुपारी १ वा.ची देवरूख - सावंतवाडी, १.४५ वा.ची गणपतीपुळे - कोल्हापूर, ३ वा. मार्लेश्वर - सांगली, सायंकाळी ५ वा. रत्नागिरी - कोल्हापूर, ५.४५ वा. देवडे - मुंबई तर शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजताची साखरपा - बोरिवली व सायंकाळी ७ वा.ची साखरपा - बोरिवली यांचा समावेश आहे.