मित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:21 PM2019-05-13T12:21:03+5:302019-05-13T12:22:57+5:30

मित्राच्या लग्नाला मुंबईहून बँन्जो पार्टी घेऊन आलेल्या ग्रुपमधील अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या एका ३५ वर्षीय प्रौढाला फिट येवून तो पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सकाळी बेनीमाळ येथे घडली आहे .

Due to drowning of a mature friend for a friend's marriage | मित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

मित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देमित्राच्या लग्नासाठी आलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यूफिट येवून मृत्यू ओढवल्याची घटना

लांजा : मित्राच्या लग्नाला मुंबईहून बँन्जो पार्टी घेऊन आलेल्या ग्रुपमधील अंघोळीसाठी नदीवर गेलेल्या एका ३५ वर्षीय प्रौढाला फिट येवून तो पाण्यात बुडून मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सकाळी बेनीमाळ येथे घडली आहे .

पनोरे येथील विनोद विष्णू मोर्ये हे नोकरीनिमित्ताने मुंबई येथे राहत असून विनोद यांचे लग्न गावी पनोरे येथे रविवारी होते. त्यासाठी त्याच्या मित्रांची मुंबईत बँन्जो पार्टी असल्याने विनोद यांनी त्यांना लग्नाला बँन्जो वाजविण्याची आॅर्डर दिली होती. मुंबई येथील विविध भागामध्ये राहणाऱ्या दहा मित्रांचा ग्रुप दि. १० मे रोजी रात्री पनोरे येथे येण्यासाठी निघाला.

मुंबई दादर येथून त्यांनी खाजगी गाडी करून ते दि. ११ मे रोजी दुपारी २.३० वाजता पनोरे येथे आले होते. त्यानंतर आराम केला व रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने बँन्जो वाजविला.

रविवारी लग्न असल्याने सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने सहा मित्र अंघोळीसाठी मुचकुंदी नदी पात्रात बेनी माळ येथे अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले होते. सर्व मित्र छातीभर पाण्यात अंघोळ करीत असताना मनोज वामन राणे (३५, साई नगर अपार्टमेंट सुबाई कंपाऊंड नायर गणपती मंदिर विलसावरक विरार) हाही छातीएवढ्या पाण्यात अंघोळ करीत असताना त्यांला फिट आल्याने तो पाण्यात बुडाला.

सर्व मित्र अंघोळी करण्यात दंग असल्याने मनोज यांच्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. अंघोळी करून झाल्यानंतर सर्वजण पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांना मनोज राणे दिसला नाही. त्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र तो कुठे सापडत नसल्याने मित्रांनी ओरडून बेनी येथील ग्रामस्थ मनोज महादेव कोंडसकर यांना बोलावून मनोज राणे यांचा शोध घेण्यास सांगीतले.

त्यानुसार मनोज कोंडसकर यांनी नदी पात्रात उतरून त्याचा शोध घेतला असता उंच पाण्यात पुलाच्या पिलरजवळ मनोज राणे सापडला त्याला पाण्याच्या बाहेर काढला असता त्यांच्या नाका तोंडातून रक्त व फेस येत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली येथे उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र साटवली येथील आरोग्य केंद्र्र बंद असल्याने लांजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टर यांनी तपासले असता मनोज हा मृत असल्याचे घोषित करण्यात आले.

मनोज राणे यांचा बुडून मृत्यू झाल्याची खबर त्याचा मित्र सुभाष भिकाजी डांबरे (३०, मुंबई गोरेगाव) यांनी पोलिसांना दिल्यावरून पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अधिक तपास सुनील चवेकर हे करीत आहेत.

Web Title: Due to drowning of a mature friend for a friend's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.