मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणामुळे माती रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 06:01 PM2019-06-11T18:01:37+5:302019-06-11T18:09:11+5:30
मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर ते हातीवले या रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यालगत आहे. काही ठिकाणी डायव्हर्शनमुळे मातीचा रस्ता वापरावा लागत आहे.
सोमवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. या मातीमुळे गाड्यांचे टायर स्लिप होत असल्याने राजापूर ते हातिवलेदरम्यान अनेक गाड्या चढावात थांबल्या होत्या. या भागात वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मध्यरात्री उशिरापर्यंत गाड्या संथगतीने या मार्गावरून जात होत्या.
गेल्याच महिन्यात अचानक कोसळलेल्या पावसामुळे लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे याठिकाणीदेखील वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगत ठेवण्यात आलेली माती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी ही माती रस्त्यावर आल्यास अपघाताची शक्यता अधिक आहे. रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेली माती बाजूला न केल्याने ती रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा होणार आहे.
वाहने सावकाश हाका
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिग रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आले आहेत. ही माती पावसाळ्यात रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन वाहने घसरण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहने सावकाश चालविणे आवश्यक आहे.