मुसळधार पावसामुळे गुजरातची भरकटलेली नौका आली रत्नागिरीच्या किनाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 02:08 PM2017-09-20T14:08:31+5:302017-09-20T14:14:13+5:30
मुसळधार पाऊस, वादळसदृश वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरी नजिकच्या पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली आहे.
रत्नागिरी, दि. 20 - मुसळधार पाऊस, वादळसदृश वारे आणि खवळलेला समुद्र यामुळे भरकटलेली गुजरातची एक मासेमारी नौका रत्नागिरी नजिकच्या पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली आहे. तटरक्षक दल तसेच स्थानिक ग्रामस्थांनी ही नौका क्रेनच्या सहाय्यानं बांधून ठेवली. सुदैवानं या घटनेत कोणतीही दुर्घटना झालेली नाही.
मंगळवारी (19 सप्टेंबर ) रात्री ही नौका भरकटली. या नौकेवर एकूण दहा खलाशी होते. भरकटल्यामुळे ही नौका मिरकरवाडा बंदरात जाण्याऐवजी मिऱ्या येथे पांढऱ्या समुद्रावर वाळूत येऊन अडकली. नौकेवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. रात्री उधाणाच्या भरतीत ही बोट कलंडून फुटण्याची भीती खलाशांना वाटतत होती, मात्र सुदैवानं तसे काहीही झाले नाही. या नौकेत तीन टन मासळी आहे. यामुळे ती सातत्याने एका बाजूला झुकत होती. किना-यावर आल्यानंतर ही नौका ती क्रेनच्या सहाय्यानं (हायड्रा) बांधून ठेवण्यात आली. त्यामुळे ती सुरक्षित राहिली.