एस.टी.च्या अपघातात घट

By Admin | Published: December 20, 2014 11:36 PM2014-12-20T23:36:53+5:302014-12-20T23:36:53+5:30

परिवहन महामंडळ : गेल्या आठ महिन्यात झाले ८८ अपघात

Due to ST accident | एस.टी.च्या अपघातात घट

एस.टी.च्या अपघातात घट

googlenewsNext

रत्नागिरी : चालकांसाठी प्रशिक्षण, योग्य नियोजन, गाड्यांची वेळच्यावेळी दुरूस्ती, जुन्या गाड्या भंगारात काढून नवीन गाड्यांचा समावेश शिवाय दररोज घेण्यात येणाऱ्या आढावा यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या अपघातामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी वर्षभरात १२० अपघात झाले होते तर चालू वर्षी गेल्या आठ महिन्यात ८८ अपघात घडले आहेत.
गेल्या वर्षभरातील एकूण १२० अपघातापैकी १७ प्राणांतिक अपघात असून ९६ अपघात गंभीर आहेत तर किरकोळ अपघात ७ आहेत. तर चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर अखेर प्राणांतिक अपघात ९ असून गंभर अपघात ७३ तसेच किरकोळ अपघात ६ आहेत.
गतवर्षापेक्षा यावर्षी अपघातामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. एस. टी.च्या अपघातानंतर अपघाताच्या स्वरूपावर जखमी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत निधी देण्यात येतो.
अपघातानंतर चालकाची चौकशी केली जाते. शिवाय त्याला प्रशिक्षणासही पाठविण्यात येते. रत्नागिरी विभागाात सध्या २४० चालक प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच प्रशिक्षण पूर्ण करून चालक सेवेत हजर होणार आहेत. त्यामुळे सध्या चालकांवर येणाऱ्या दुहेरी ड्युटीचा ताणदेखील कमी होणार आहे. त्यामुुळे अपघात होत असले तरीही गेल्या काही महिन्यात ते प्रमाण कमी झाले आहे. एस. टी.चा कारभार आता हळूहळू सुधारत असल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी आगारात एस. टी.च्या ७९० गाड्या असून, त्यामध्ये लवकरच नवीन १०० गाड्यांची भर पडणार आहे. दररोज एस. टी.च्या ४५०० फेऱ्यांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर प्रवास होतो.
दररोज एस. टी. एकूण ५० हजार लीटर डिझेल लागते. त्यासाठी किमान ३० लाख १५ हजार ५०० रूपये खर्च येतो. प्रतिदिन विभागास ६५ लाख रूपये खर्च येतो. विभागात १४७३ चालक, १६०० वाहक असून, दरमहा ५ ते १७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, गेल्या दहा महिन्यात १३९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ३१ हजार ७८४ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रत्नागिरी विभागाचे पूर्वी प्रतिदिन ५० लाखांपर्यंत उत्पन्न होते. परंतु सध्या उत्पन्नात वाढ झाली असून, ६५ लाख इतके झाले आहे. अनेक ठिकाणी सुमारे ५० हून अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, निवडणूक, तसेच उन्हाळी सुटीचे योग्य नियोजन करण्यात आल्याने विभागाला नुकतीच ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विनाअपघात सेवा, स्वच्छ व सुंदर गाड्या या योजना राबविण्यात येत आहेत. नवीन वर्षात ‘मागेल त्याला एस. टी.’ ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to ST accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.