बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल

By अरुण आडिवरेकर | Published: June 5, 2023 05:55 PM2023-06-05T17:55:25+5:302023-06-05T17:56:40+5:30

या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या

Due to the smoke spread in the tunnel trains on the Konkan Railway line were delayed | बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल

बोगद्यात पसरलेल्या धुरामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा खाेळंबा, प्रवाशांचे हाल

googlenewsNext

रत्नागिरी : रेल्वे मार्गालगत जाळण्यात आलेल्या कचऱ्याचा धूर बाजूच्या रेल्वे बाेगद्यामध्ये पसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सहा ते सात एक्स्प्रेस गाड्यांचा खाेळंबा झाला. ही घटना साेमवारी (५ जून) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजापूर नजीकच्या निवसर स्थानकाजवळ घडली. दरम्यान, दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.

कोकण रेल्वे मार्गावरील निवसर स्थानकानजीक असलेल्या बाेगद्याजवळ कचरा जाळण्यात आला. या कचऱ्याचा धूर जवळच असलेल्या रेल्वेच्या बाेगद्यामध्ये पसरला. याचदरम्यान मंगला एक्स्प्रेस गाेव्याच्या दिशेने जात होती. धुराची झळ बसल्याने मंगला एक्स्प्रेससह त्याचवेळी त्या भागातून मुंबईच्या दिशेने जाणारी दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसही अडकून पडली हाेती.

या दोन गाड्यांच्या पाठोपाठ दोन्ही बाजूंनी येणाऱ्या अन्य पाच एक्स्प्रेस गाड्यांना याचा फटका बसला. बाेगद्यातील धुराचे प्रमाण कमी झाल्यानंतर पावणेतीन वाजण्याच्या दरम्यान गाड्या मार्गस्थ झाल्या. ताेपर्यंत प्रवाशांना हाल साेसावे लागले. निवसरमधील या घटनेमुळे या सर्व गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या.

या गाड्यांना बसला फटका

एर्नाकुलम-एलटीटी दुरंतो एक्स्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, मुंबईकडे जाणारी मरूसागर एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस, अमृतसर-कोचुवेली एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

Web Title: Due to the smoke spread in the tunnel trains on the Konkan Railway line were delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.