केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:20 PM2022-03-14T19:20:17+5:302022-03-14T19:36:51+5:30

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. गावानजीकच हा अपघात झाल्याने व डंपर नदीपात्रात कोसळल्याने मोठा आवाज झाला.

dumper broke the bridge wall and fell into the river basin At Kelwat, driver injuring | केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी

केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी

Next

मंडणगड : डांबरमिश्रित खडी घेऊन जाणारा डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हा डंपर विसापूर येथून देव्हारे येथे जात असताना केळवत (ता. मंडणगड) हा अपघात झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला आहे.

विसापूर येथील डांबर प्लांटवरून रस्त्याच्या कामाकरिता वापरात येणारी डांबरमिश्रित खडी भरून रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीचा दहाचाकी डंपर देव्हारे येथे जात होता. केळवत येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. गावानजीकच हा अपघात झाल्याने व डंपर नदीपात्रात कोसळल्याने मोठा आवाज झाला.

या आवाजामुळे घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले. डंपर खाली अडकलेल्या चालकाला सोडवण्याकरिता तीन जेसीबी अपघातस्थळी बोलवण्यात आले हाेते. सुमारे एक तासांच्या प्रयत्नानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर चालकाला उपचाराकरिता पाठवण्यात आले.

या मार्गावरून मंडणगडकडे येत असलेले विभागीय पोलीस निरीक्षक काशीद यांनी हा अपघात पाहिला. गांभीर्य लक्षात घेत ते स्वत: रेस्क्यू मोहिमेत सहभागी झाले हाेते. यावेळी प्रतीक पोतनीस, योगेश जंगम, राकेश गायकवाड, सुशील जागुष्ठे, नगरसेवक मुश्ताक दाभीळकर, इरफान बुरोंडकर, आल्पेश भोसले यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामूणकर, पत्रकार प्रशांत सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यात सहभाग नोंदविला.

Web Title: dumper broke the bridge wall and fell into the river basin At Kelwat, driver injuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.