संगमेश्वर तालुक्यात डंपर-दुुुुचाकीत धडक, भीषण अपघातात दुुुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 03:01 PM2021-05-08T15:01:13+5:302021-05-08T15:02:42+5:30
Accident Ratnagiri : संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला . या अपघातात दुचाकीस्वार याच्या डोक्यावरूनच डंपरचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली राजीवली मार्गावर मुरडव बौद्धवाडी वळणावर डंपर आणि दुुुुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (२६) जागीच ठार झाला आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास झाला .
या अपघातात दुचाकीस्वार याच्या डोक्यावरूनच डंपरचे मागील चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
संगमेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार याबाबतची फिर्याद मुरडव गावचे पोलीस पाटील राजेंद्र मेणे यांनी दिली आहे. सकाळी मुरडव बाटेवाडीत राहणारा योगेश तुकाराम बाटे हा तरुण आरवलीहून मुरडवकडे दुचाकी (एमएच ०४ डीएच १९८३) ने चालला होता.
मुरडव येथील छोट्याशा वळणावर येताच समोरून येणाऱ्या डंपर (एमएच ०४ सीयू ९६६३) यांच्यात धडक झाली. दुचाकी डंपरच्या उजव्या बाजूला धडकली.याच वेळी योगेश डंपर च्यामागील चाका खाली आला आणि डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेले. ही धडक एवढी मोठी होती की, दुुुचाकीस्वार योगेश बाटे जागीच ठार झाला.
भीषण धडकेमुळे योगेश बाटेच्या डोक्याला जबर दुखापत होऊन मेंदू बाहेर पडला. अपघाताची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलीस चेकपोस्टवरील पोलीस गणेश बिक्कड,पोलीस ग्रामस्थ संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडविलकर,आदी ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले व योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर ३०४(अ)३३७,३३८,२७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.