..अन् दिव्यांगांनी घेतली गगनभरारी, दुर्गाशक्ती संस्थेने घडवून आणला विमान प्रवास
By मेहरून नाकाडे | Published: June 6, 2024 05:33 PM2024-06-06T17:33:11+5:302024-06-06T17:34:06+5:30
रत्नागिरी : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना ...
रत्नागिरी : आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकण पाहतो. पण सर्वांच्याच नशिबी ते शक्य नसते. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच. मात्र त्यांनाही विमानातून प्रवासाचा अनुभव घेता यावा यासाठी दिव्यांगासाठी कार्यरत असणार्या दुर्गाशक्ती संस्थेतर्फे दिव्यांगाना विमान प्रवास घडवून आणला. मुंबई ते हैदराबाद असा हा प्रवास झाला.
जिल्ह्यातील नऊ दिव्यांगानी विमानप्रवास केला. चिपळूणमधून निघून मुंबई-हैदराबाद असा प्रवास घडवण्यात आला. अवघ्या सव्वा तासात विमान हैदराबाद विमानतळावर दाखल झाले. येथील मुग्धा शाह यांच्या निवासस्थानी त्यांनी रात्री मुक्काम केला. दुसर्या दिवशी रामोजी फिल्म सिटीची सफर घडवून आणली. परतीचा प्रवास रेल्वेतून करताना या बांधवांनी रेल्वे प्रवासाचाही अनुभव घेतला.
विमान प्रवास तिकीट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष दिनेश पोतनीस यांनी प्रायोजित केले. ही सहल यशस्वी होण्यासाठी, समिर नाकाडे, मुग्धा शाह, अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.