जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी पुन्हा ई-पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:31 AM2021-04-24T04:31:11+5:302021-04-24T04:31:11+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने पुन्हा आणखी कठाेर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ...
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने पुन्हा आणखी कठाेर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पुन्हा एकदा ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. त्यासाठी रितसर प्रशासनाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.
राज्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत असणारे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई-पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई-पास काढावा लागणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाह सोहळ्यांवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या दरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई-पासचा वापर करावा, असे आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.