१० लाखांवरील कामांसाठी ई-निविदा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:24 AM2021-05-29T04:24:08+5:302021-05-29T04:24:08+5:30

रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर ३ लाख रुपयांपेक्षा जास्त कामाची ई-निविदा काढण्यात येत होती. आता ...

E-tender will be issued for works above 10 lakhs | १० लाखांवरील कामांसाठी ई-निविदा काढणार

१० लाखांवरील कामांसाठी ई-निविदा काढणार

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर ३ लाख रुपयांपेक्षा जास्त कामाची ई-निविदा काढण्यात येत होती. आता आघाडी सरकारने त्यामध्ये वाढ करून १० लाखांपेक्षा जास्त असलेल्या विकास कामांची ई-निविदा काढण्यात येणार आहे. त्यामुळे १० लाखांपेक्षा कमी किमतीची कामे ई-निविदा काढल्याशिवाय करता येणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २६ नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार व ग्रामविकास विभागाच्या दि. २७ मे, २०१५ रोजीच्या निर्णयात नमूद केल्यानुसार, ३ लाख रकमेवरील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामे ई-निविदा पद्धतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आता या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आला असून, विविध विकास कामांच्या १० लाख रुपये रकमेवरील कामांकरिता ई-निविदा पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्याचा फायदा अनेक ग्रामपंचायतींना होणार आहे. कारण अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक स्तरावर कमी रकमेची विकास कामे असतात.

Web Title: E-tender will be issued for works above 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.