पुढच्या वर्षीही लवकर या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:34 PM2017-08-31T23:34:31+5:302017-08-31T23:34:31+5:30

Early this year too ...! | पुढच्या वर्षीही लवकर या...!

पुढच्या वर्षीही लवकर या...!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गुरूवारी आवडत्या बाप्पाला भक्तांनी जड अंत:करणाने निरोप दिला. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे तसेच गौरींचे गुरुवारी विसर्जन करण्यात आले.
यावर्षी गणरायाचा सात दिवस मुक्काम होता. यापूर्वी दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले आहे. गुरुवारी सातव्या दिवशी जिल्ह्यातील एकूण १ लाख १६ हजार ४५ गणेशमूर्तींचे गौरींसह विसर्जन करण्यात आले. दुपारनंतर विसर्जनासाठी मूर्तींना बाहेर आणण्यात आले. यावर्षी डॉल्बी किंवा डीजे याच्यावर बंदी असल्याने विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या साथीने काढण्यात आली. काल बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या आगमनाने गजबजलेले घर आता त्याच्या जाण्याने रिते होणार, या कल्पनेने बहुतांशी महिलावर्गाचे डोळे भरून येत होते. आरती झाल्यानंतर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घरगुती ५,६२८ तर सार्वजनिक ४, ग्रामीण पोलीस स्थानकाचे हद्दीत घरगुती ७,६९४ गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
जिल्हा पोलीस प्रशासनाने विसर्जनस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. जिल्ह्यातील १३ प्रमुख विसर्जनस्थळांवर व ३९८ घाटांवर सीसीटीव्ही कॅमºयांद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. प्रमुख किनाºयांवर जीवरक्षकांना अत्याधुनिक सामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले होते. निर्माल्य संकलनासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह रोटरी क्लब तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
निर्माल्य संकलन : विविध सामाजिक संस्थांचा उपक्रमात सहभाग
जिल्ह्यातील एक लाख १६ हजार २८ घरगुती आणि १७ सार्वजनिक गणेशांचे विसर्जन.
यावर्षी गौरी-गणपतीचा सात दिवस मुक्काम.
डॉल्बी किंवा डीजे यांच्या वापरावर बंदी.
विसर्जन मिरवणूक ढोल - ताशांच्या गजरात.
पावसाने विश्रांती घेतली असल्याने वाजतगाजत विघ्नहर्त्याला निरोप.
रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु.
रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था तसेच विविध सामाजिक संस्था, शाळा - महाविद्यालये यांच्या सहकार्याने विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात आले. शहरातील भक्तांनीही या उपक्रमाला सहकार्य केले.

Web Title: Early this year too ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.