सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त

By अरुण आडिवरेकर | Published: April 3, 2023 11:46 AM2023-04-03T11:46:09+5:302023-04-03T11:46:37+5:30

रत्नागिरी : सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणूक प्रकरणी ईडीकडून राज्यात कारवाई सुरू आहे. यात सहा कोटी ६९ लाखांची मालमत्ता ...

ED seizes agricultural land of Magnum Steel partners in Ratnagiri in Seva Vikas Cooperative Bank fraud case | सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त

सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त

googlenewsNext

रत्नागिरी : सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणूक प्रकरणी ईडीकडून राज्यात कारवाई सुरू आहे. यात सहा कोटी ६९ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नम स्टीलचा सामावेश असून,  मॅग्नम स्टीलचे भागिदार कुणाल गांधी आणि किशोर गांधी यांची रत्नागिरीतील शेतजमीन ईडीने जप्त केली आहे.

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासलेले नाहीत. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आणला होता.

बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांची संपत्ती जप्त केली होती. आता मॅग्नम स्टीलचे कुणाल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत ही कारवाई केली आहे.

कुणाल गांधी आणि किशोर गांधी हे मॅग्नम स्टीलचे भागीदार आहेत. त्यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम आपल्या इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करून त्यातून ३ तात्पुरत्या मालमत्ता खरेदी केल्या. त्यामध्ये अंधेरी, मुंबई येथे असलेले दुकान तसेच कार्यालय, पनवेल येथील एक सदनिका आणि रत्नागिरी येथे असलेल्या शेतजमिनीचा समावेश आहे. पुणे शहरातही ५.२४ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी खरेदी केली होती. या सर्व ठिकाणी कारवाई करून मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: ED seizes agricultural land of Magnum Steel partners in Ratnagiri in Seva Vikas Cooperative Bank fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.