लसीकरणावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:08+5:302021-07-29T04:31:08+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना महामारीबरोबरच महापुराने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे लसीकरणाला आलेली गती पुन्हा थांबली आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये महापुराची ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना महामारीबरोबरच महापुराने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे लसीकरणाला आलेली गती पुन्हा थांबली आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये महापुराची स्थिती असल्याने संगमेश्वर, चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली या पाचही तालुक्यांतील लसीकरणावर परिणाम झाला आहे.
विहीर जमीनदोस्त
चिपळूण : तालुक्यातील रिक्टोली-इंदापूरवाडी हे गाव अत्यंत डोंगरात सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी दुर्गम भागात आहे. पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे जिल्हा परिषदेने बांधून दिलेली नवीन विहीर पूर्ण जमीनदोस्त झाली आहे आणि जो आधीच खराब रस्ता होता, तो पूर्ण खचून गेला आहे.
ट्रकचालकांना भोजन
साखरपा : कोंडगावमधील सार्वजनिक गणेश मित्रमंडळामार्फत आंबा घाटात अडकलेल्या ट्रकचालकांना शुद्ध पाण्याची बाटली, भोजनाची पॅकेटस् देण्यात आली आहेत. मुख्य रस्ता खचल्याने पुढील आदेशापर्यंत आंबा घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहने अडकली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन मार्गावरील पांगरे बौद्धवाडी रस्त्यावर झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरील दुतर्फा असलेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही झाडे तोडण्यासाठी बांधकाम खात्याने तसेच ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
जनावरे गेली वाहून
चिपळूण : निसर्गाच्या रौद्ररूपासमाेर काहीही टिकलेले नाही. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हाल झाले आहेत. महापुराच्या पाण्यात स्थानिक रहिवाशांनी आपले जीव कसेबसे वाचविले. मात्र, श्वान, मांजरे व इतर पाळीव प्राण्यांना वाचवू शकले नाही.