रत्नागिरी जिल्ह्यातील हिवताप विभागात रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न
By admin | Published: April 13, 2017 01:29 PM2017-04-13T13:29:11+5:302017-04-13T13:29:11+5:30
कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉ. महेश खलिफे यांचे आश्वासन
आॅनलाईन लोकमत
अडरे जि. रत्नागिरी, दि. १३ : रत्नागिरी जिल्ह्यातील हिवताप विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉ. महेश खलिफे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना (आरोग्य सेवा) जिल्हा शाखा, रत्नागिरी यांच्यातर्फे शहरातील विवेकानंद सभागृहात द्वी वार्षिक अधिवेशन उत्साहात झाले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना अध्यक्ष आर. एन. सोनार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुधाकर सावंत, माजी अध्यक्ष व्ही. जी. नार्वेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी उपस्थित होते. हे अधिवेशन चिपळूण शहरात दोन दिवस उत्साहात झाले. यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
खलिफे म्हणाले की, ग्रामीण व दुर्गम भागात हिवताप कर्मचारी तूटपुंजा मानधनावर काम करत असतात. त्यामुळे त्यांचा विचार करणे गरजेचे असून, त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी, असेही सांगितले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी. चौगुले, आरोग्य पर्यवेक्षक डी. डी. कदम, अभिजीत यादव, कांता रहाटे, वसंत रहाटे, रमेश जानवलकर, स्वप्नील तांबे, एस. डी. म्हादलेकर, पी. टी. कदम यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)