कोकणातून जास्तीत जास्त आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न - सत्यजित तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:42+5:302021-03-27T04:32:42+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काँग्रेसने नेहमीच स्वतः सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रासह कोकणामध्येही काँग्रेसने भक्कमपणे उभे राहण्यासाठी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काँग्रेसने नेहमीच स्वतः सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रासह कोकणामध्येही काँग्रेसने भक्कमपणे उभे राहण्यासाठी आणि या भागातून किमान १० ते १५ आमदार काँग्रेसचे येण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात रत्नागिरीत काँग्रेसतर्फे शुक्रवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी सत्यजित तांबे यांची उपस्थिती हाेती. उपाेषणादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत कोकणात काँग्रेस स्वतंत्रपणे ताकद अजमावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या आम्ही राज्यात सत्तेत असलो तरीही राज्यामध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठीच काँग्रेसचे प्रयत्न असतील आणि त्या दृष्टीनेच आम्ही पावले उचलत आहोत. कोकणामध्येही आम्ही आता लक्ष केंद्रित केले असून, काेकणात आमचे किमान १० ते १५ आमदार निवडून यावेत, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच पक्षामध्ये येणाऱ्या युवा पिढीला सत्तेत सहभाग देणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युवकांना प्राध्यान देण्याची आमची मागणी असेल, असेही तांबे यांनी सांगितले.