दापाेलीतील आराेग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यासाठी प्रयत्न सुरू : याेगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:27 AM2021-04-26T04:27:49+5:302021-04-26T04:27:49+5:30
दापोली : आमदार याेगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील केळशी आणि आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. ...
दापोली : आमदार याेगेश कदम यांनी दापोली मतदार संघातील केळशी आणि आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी मतदार संघातील सर्व आराेग्य केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
आमदार कदम यांनी दिलेल्या या भेटीत त्यांनी लसीचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे, तसेच गरजेनुसार अँटिजन चाचणी तसेच आरटीपीसीआर चाचणी वाढविणे, लोकांना बसण्यासाठी सावली निवारा शेड, केळशी आरोग्य केंद्रातील रिक्त असणाऱ्या जागा त्वरित भरण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, तालुका संघटक उन्मेष राजे, केळशी विभागप्रमुख संदीप चिखले, सुनील दळवी, काका श्रीवर्धनकर, दादा धावरे, माजी सरपंच सुरेंद्र कार्दकर, यशवंत बैकर, आंजर्ले शाखाप्रमुख बंड्या सुर्वे, मुर्डी सरपंच किरण सांबरे, सदस्य सरिता आरेकर, पाडले सरपंच रवींद्र सातनाक, मुर्डी पोलीसपाटील प्रमोद राऊत, विनोद सुर्वे, मकरंद म्हादलेकर, तृशांत भाटकर, अभि केळस्कर, माजी सरपंच संदेश देवकर उपस्थित होते.