आठ महिन्यात कामच नाही, मी भाजपमुक्त : रमेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:51 PM2017-10-11T13:51:14+5:302017-10-11T14:17:01+5:30

भाजपात जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज केली

Eight months do not work, I'm free from the BJP: Ramesh step | आठ महिन्यात कामच नाही, मी भाजपमुक्त : रमेश कदम

आठ महिन्यात कामच नाही, मी भाजपमुक्त : रमेश कदम

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यकर्ते सांगतील ती दिशा ठरविणार : रमेश कदमपालिकेत भ्रष्टाचार- आम्ही पापाचे धनी होणार नाही सत्तेत पाठिंबा नाही, सारे गैरव्यवहार खणून काढणारलवकरच कार्यकर्त्यंचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार

चिपळूण, 11 : भाजपात जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज केली

आपणाच लवकरच कार्यकर्त्यंचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार आहोत असे सांगतानाच कोणत्या पक्षात जाणार आहोत याचा अद्याप विचार केला नसल्याचे कदम यांनी स्यष्ट केले.  यावेळी त्यांनी नगरपालीकेच्या कारभारावार टीका केली.

लोकांची कामे होत नसतील आणि विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचारच होत असेल तर आपण यावर आक्रमक होवून पावले उचलू. परिवर्तनच्या नावाखाली हे सत्तेवर आले व लाखो रुपयांचा टेंडर घोटाळा सुरू आहे , हे मी पाहतो आहे, त्यामुळे आमच्या नगरसेवकांचा गट स्वतंत्र आहे तो यांना पाठींबा देणार नाही. प्रामाणिक व विधायक काम असेल तर जरुर विचार करू मात्र आजपासून आम्ही नगरपालीकेत स्वतंत्र आहोत असेही  कदम यांनी सांगितले.

लोकांना साध पाणी व्यवस्थित मिळत नाही, भुयारी गटारांसारख्या फसव्या योजना विकासाच्या नावाखाली आणल्याचे सांगितले जाते पण हे सारे चुकीच असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

Web Title: Eight months do not work, I'm free from the BJP: Ramesh step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.